PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024   

PostImage

लोकांनी पूर्ण जोर लावून मतदान केलं नाही, तर हे मॅच …


"लोकांनी पूर्ण जोर लावून मतदान केलं नाही, तर हे मॅच फिक्सिंगमध्ये यशस्वी होतील. ज्यादिवशी यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, त्यादिवशी आपलं संविधान नष्ट होईल," असं राहुल गांधी म्हणाले.

 

"ज्या दिवशी संविधान संपुष्टात आलं, त्यादिवशी आपल्यावर फार मोठा आघात होईल," असंही ते म्हणाले.

 

"ही काही एखादी साधी निवडणूक नाही. ही संविधान वाचवण्यासाठीची, देश वाचवण्यासाठीची, वंचित आणि गरिबांचा हक्क वाचवण्यासाठीची निवडणूक आहे. या निवडणुकीत स्पष्टपणे मॅच फिक्सिंग दिसत असल्याचं भाजपचेच लोक म्हणत आहेत."

 

"मोदींनी निवडणूक आयोगात त्यांचे लोक भरले. देशातील दोन मुख्यमंत्री राहिलेल्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं," असा आरोपही राहुल गांधींनी केला.

 

"त्यांनी आमचं बँक अकाऊंटही बंद केलं. त्यांना हे करायचं होतं तर सहा महिन्यांपूर्वी किंवा सहा महिन्यांनंतरही करता आलं असतं. पण हे सर्व काही निवडणुकीमुळं करण्यात आलं."


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

जनता महागाईच्या ओझ्याखाली दबली,जनतेवर आर्थिक अन्याय; राहुलचा आरोप


 कोरबा, वृत्तसंस्था. भाजपा सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले. प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात आहे. सत्ता, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ... देशातील कोणत्याही उद्योगात निवडक लोक असतात, याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी चालवली जात आहे. बाकीची जनता महागाई खाली दबली गेली आहे. हा आर्थिक अन्याय असल्याची टीका काँग्रेस नेते राहु गांधी यांनी केली. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते छत्तीसगडमधील कोरबा येथे आले असताना एका सभेला संबोधित करीत होते.

 

केंद्र सरकारवर घणाघात मागासलेले लोक, दलित आणि आदिवासी हे देशातील 74 टक्के आहेत, परंतु या समुदायातीलएकही व्यक्ती भारतातील सर्वोच्च 200 कंपन्यांचा मालक नाही किंवा ज्यांना देशाचा पैसा दिला जात आहे त्यांच्या व्यवस्थापनात सहभागी नाही. ते म्हणाले की, भाजपा याला हिंदु राष्ट्र म्हणतो पण देशातील 74 टक्के लोकसंख्या आणि सर्वसामान्य गरिबांना काहीच मिळत नाही. ते फक्त ताट वाजवायला, बेल वाजवण्यासाठी, मोबाईल दाखवायला आणि उपाशी मरण्यासाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

 

लोकांच्या कष्टाचा सर्व पैसा भांडवलदारांच्या कंपन्यांमध्ये जात आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये दलित आणि मागासलेले लोक नाहीत. देशातील विविध क्षेत्रात दलित आणि मागासवर्गीयांचा सहभाग नाही. भाजपा हिंदू राष्ट्राबाबत बोलते, मात्र मागास, दलित, आदिवासी वर्गाला काहीच मिळत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही एकही गरीब-मजूर शेतकरी दिसला नाही.

- राहुल गांधी, नेते, काँग्रेस

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

तुम्ही फोन पाहता, ते पैसे कमावतात! ,खिशावर पडतोय दरोडा : …


 

कोरबा (छत्तीसगड) : मोबाइल वापरणे हे एक प्रकारचे व्यसन असून, ते तुमच्यावर लादले जात आहे. जेणेकरून उद्योगपती अधिकाधिक पैसे कमावू शकतील. तुम्ही तुमचा मोबाइल जितका जास्त वापरता तितके ते (उद्योगपती) जास्त पैसे कमावतात, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे म्हटले.

 

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजकाल लोक आणि विद्यार्थी सुमारे ८-१० तास मोबाइलवर असतात. हे सर्वांत धोकादायक व्यसन आहे. उद्योगपती दिवसातून फक्त १०-१५ मिनिटे मोबाइल वापरतात. कारण त्यांचे लक्ष पैसे कमावण्यावर असते. ते २४ तास पैसे कमावतात. हे पैसे तुमच्या खिशातून जात आहेत. मी सतत हे सांगतोय; पण तुम्हाला ते समजत नाही. तुमचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. फोन असो किंवा मीडिया, कधी ते अक्षय कुमारला नाचताना दाखवतील तर कधी ऐश्वर्या रायला आणि तुमचे पैसे जात राहतील. तुम्ही मोबाइल पाहा, सकाळी, दुपारच्या जेवणात आणि रात्री स्वतःला एकच प्रश्न जरूर विचारा की, तुम्हाला भारताच्या तिजोरीतून दररोज किती पैसे मिळतात. ज्या दिवशी १० लाख लोक हा प्रश्न विचारू लागतीलतेव्हा संपूर्ण देश हादरून जाईल.

तुम्हाला हे (मुद्दे) समजत नाही असे म्हणणे मला आवडत नाही; मात्र प्रत्यक्षात दिशाभूल करून तुमच्या खिशावर दरोडा टाकला जातोय, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

 

 

परीक्षेमुळे यात्रेचा

कालावधी घटवला

■ 'भारत जोडो न्याय यात्रे'चा उत्तर प्रदेश (यूपी) टप्प्याचा कालावधी कमी करण्यात आला असून, आता ही यात्रा ११ दिवसांऐवजी फक्त सहा दिवसच उत्तर प्रदेशात राहणार आहे.

 

■ १०, १२ वीच्या परीक्षांमुळे हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. पूर्वनियोजित रापत्रकानुसार ही यात्रा १६ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत उत्तर प्रदेशात भ्रमंती करणार होती;

 

■ परंतु राज्यात २२ फेब्रुवारीपासून दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने आता २१ फेब्रुवारीपर्यंतच ही यात्रा या राज्यात राहणार आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 23, 2024   

PostImage

आसाम: मंदिरात जाताना अडवलं, राहुल गांधींचं धरणं आंदोलन; राजकीय संघर्ष …


 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममधून जात असताना गेल्या दोन दिवसांपासून आसाममध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

 

राहुल गांधी सोमवारी, 22 जानेवारीला नागाव जिल्ह्यातील बताद्रवा येथील श्री श्री शंकरदेव सत्ता (मठ) मंदिरात जाणार होते, परंतु स्थानिक प्रशासनातर्फे त्यांना 17 किलोमीटर अलीकडे हैबोरगाव येथे रोखण्यात आलं.

 

आसामी समाजातील प्रतिष्ठित वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी असलेल्या बताद्रवा सत्र मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर संतप्त झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हैबरगाव येथेच धरणं आंदेलन सुरू केलं.

त्यापूर्वीच्या एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी गाडीतून खाली उतरून पोलिसांना यात्रा थांबवण्यामागचं कारण विचारताना दिसले होते.

 

धरणे आंदोलनावर बसण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली आणि प्रसारमाध्यमांना म्हणाले, “असं दिसतंय की आज फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्याची परवानगी आहे. मंदिरात कुणी जायचं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार का?”

 

ते पुढे म्हणाले, "आम्हाला 11 जानेवारी रोजी शंकरदेव जन्मस्थळाला भेट देण्याचं निमंत्रण मिळालेलं, परंतु रविवारी आम्हाला सांगण्यात आलं की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूप नाजूक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाजूक असताना गौरव गोगोई आणि इतर सर्वजण वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी जाऊ शकतात, पण फक्त राहुल गांधी जाऊ शकत नाहीत.''

राहुल गांधी ज्या ठिकाणी धरणं आंदोलनाला बसले होते, त्या ठिकाणी त्यांचे समर्थक ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ भजन गाताना दिसले.

 

काँग्रेस समर्थकही शंकराचं कीर्तन गाताना दिसले.

 

त्यानंतर स्थानिक खासदार आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

 

राहुल गांधीऐंवजी आपल्याला श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर सांगितलं.

 

गौरव गोगोई यांनी एक फोटो शेअर करत सांगितलं की, "श्री श्री शंकरदेव मठ पूर्णपणे रिकामी होता. तिथे अजिबात गर्दी नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा खोट्या अफवा पसरवण्यात आलेल्या. मुख्यमंत्र्यांमुळे आजचा दिवस हा बताद्रवा आणि श्री शेंकरदेव यांच्या इतिहासात एक काळा दिवस ठरला आहे."

 

.

पुरकायस्थ म्हणतात, "सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राहुल गांधी यांच्या न जाण्याने भाजप त्यांना भविष्यात ज्याप्रकारे राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल, त्याला उत्तर म्हणून श्रीमंत शंकरदेव यांच्या दर्शनाकडे पाहिलं जातंय."

 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 22 जानेवारी रोजी बताद्रवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान भेट न देण्याचा सल्ला दिला होता.

 

"सोमवारी होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी बताद्रवा येथे न जाण्याची आम्ही राहुल गांधींना विनंती करतोय कारण त्यामुळे आसामबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होईल," असं मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

 

ते म्हणाले होते की, प्रभू राम आणि राज्यात एक आदर्श म्हणून ओळखले जाणारे मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात कोणतीही स्पर्धा असू शकत नाही.

 

याशिवाय काँग्रेसने सोमवारसाठी मोरीगाव, जगीरोड आणि नेल्ली या ‘संवेदनशील भागातून’ जाणारा जो मार्ग निवडलाय तो टाळता आला असता, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

ते म्हणाले, "हा भाग संवेदनशील आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही आणि म्हणूनच 22 जानेवारी रोजी राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान अल्पसंख्याक बहुल भागातील संवेदनशील मार्गांवर कमांडो तैनात करण्यात आले आहेत."

 

दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये भाजपमध्ये सामिल झाल्यापासून राहुल गांधींवर टीका करत आले आहेत.

 

राहुल गांधी आणि हिमंता यांच्यातील शाब्दिक युद्ध

मणिपूर येथून 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा गेल्या गुरुवारी आसाममध्ये पोहोचल्यापासून राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एका सभेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून वर्णन केलं होतं आणि असंही म्हटलेलं की ते "भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचे धडे देऊ शकतात."

 

प्रत्युत्तरादाखल सरमा यांनी गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब असल्याचं म्हटलेलं.

 

त्यानंतर राहुल गांधींची यात्रा जोरहाट शहरातून जात असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गाचं उल्लंघन केल्याप्रकरणी यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

यादरम्यान उत्तर लखीमपूरमध्ये काँग्रेसच्या अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आणि परिसरात लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर आणि बॅनर फाडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

 

या संदर्भात काँग्रेसने लखीमपूरमध्ये एक गुन्हा दाखल केला. यानंतर रविवारी ही यात्रा अरुणाचल प्रदेशातून आसाममध्ये परतत असताना आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेन बोरा यांच्यावर भाजप समर्थकांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले.

 

मात्र, या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी पोलीस महासंचालकांना गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024   

PostImage

राहुलच्या रॅलीवर भाजपाचा हल्ला


युवक काँग्रेसच्या वाहनांची तोडफोड

 

गुवाहाटी, . काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये आहे. या यात्रेच्या सातव्या दिवशी शनिवारी सकाळी राहुलगांधी यांनी लखीमपूर येथील दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शन घेतले आणि पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

 

 यादरम्यान, आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रे' वर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लखीमपूर येथे यात्रेच्या ताफ्यावर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला. यावेळी भारत जोडो न्याय यात्रेचे पोस्टर, बॅनर फाडले आणि गाड्यांची तोडफोड केली, अशी माहिती काँग्रेसने ट्वीटरवरून दिली. भाजपा सरकार भारत जोडो न्याय यात्रेला मिळणारे प्रेम आणि समर्थन पाहून घाबरलेले आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

Rahul Gandhi news: भारत न्याय यात्रा: राहुल गांधी करणार 14 …


 

काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत सुरू राहील.

 

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली.

 

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असं मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने 21 डिसेंबर रोजी मांडलं होतं.

 

"राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचं मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे," वेणुगोपाल यांनी सांगितलं.

65 दिवसांच्या या यात्रेत राहुल गांधी 6,200 किलोमीटर एवढं अंतर कापतील. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे.

 

यावेळी राहुल गांधी मणिपूर, मेघालय, नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

 

या काळात राहुल गांधी तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी चर्चा करतील असं काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं.

 

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पायीच पूर्ण केली होती. पण यावेळेसची भारत न्याय यात्रा बसमधून पूर्ण केली जाईल. वेणुगोपाल यांनी सांगितलं की, या बसमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या प्रवासात राहुल पायीही प्रवास करतील. मात्र लांबचं अंतर बसमधून पार केलं जाईल.

 

यात्रेचा उद्देश

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी 6 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा सलग 150 दिवस सुरू होती. या प्रवासात राहुल गांधींनी 4500 किलोमीटर इतका प्रवास पूर्ण केला होता. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी आणखीन एक यात्रा काढावी अशी विनंती काँग्रेस पक्षाने केली होती.

 

गेल्या आठवड्यात 21 डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यात राहुल गांधींनी दुसरी यात्रा काढावी असं ठरलं.

 

वेणुगोपाल म्हणाले की, 'सर्वांसाठी न्याय' मिळवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, "आम्हाला महिला, तरुण आणि सर्वसामान्यांसाठी न्याय हवा आहे. सध्या श्रीमंतांकडे सगळ्या गोष्टींचा ओघ सुरू आहे. त्यामुळे ही यात्रा गरीब लोकांची, तरुण शेतकरी आणि महिलांची आहे."

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त तेलंगणामध्येच विजय मिळवता आला. उर्वरित चार राज्यांमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

 

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, पण दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा दौराही केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आलं नाही.

 

देशातील केवळ तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. यात कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

काँग्रेस पक्षातील संपर्क विभागाचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा यातील फरक स्पष्ट केला आहे.

 

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तीन मुद्दे मांडले. यात आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला. त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांना या भयाण वास्तवाची जाणीव करून दिली. ही यात्रा कोणाच्याही भावना व्यक्त करण्यासाठी नव्हे तर लोकांविषयी असलेल्या काळजीपोटी काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या."

ते म्हणाले, "आता भारत न्याय यात्रा सुरू होईल. ती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी आहे. लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं आणि महागाईने होरपळणाऱ्या कोट्यवधी कुटुंबांमध्ये उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास निर्माण करणं हा या यात्रेचा उद्देश आहे."

 

राहुल गांधींचा हा प्रवास अशा वेळी सुरू होणार आहे जेव्हा देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. दरम्यान, भारतातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीतही बैठका सुरू आहेत.

 

काँग्रेस नेतृत्वासोबात अनेक राज्यांतील स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बिहार आणि उत्तरप्रदेश नंतर आंध्रप्रदेशातील नेत्यांची बैठक घेतली आहे.

 

यावर भाजप काय म्हणालं?

राहुल गांधींच्या नव्या यात्रेवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, "देशातील जनतेने भारत जोडो यात्रेची संकल्पना नाकारली होती. कारण काँग्रेस आणि राहुल गांधींच्या बोलण्या-वागण्यात फरक आहे. त्यांना आजही वाटतं की भारतातील जनतेला मूर्ख बनवता येतं. पण सत्यता तपासल्यावर कळेल की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार 2014 पासून खरा न्याय देत आहे."

 

कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय काँग्रेस नेते भारत जोडो यात्रेला देत आहेत.

इंडिया आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड हा देखील राहुल गांधींच्या यात्रेचा एक भाग आहे.

 

या भेटीबद्दल जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले, "राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेली भारत जोडो यात्रा सकारात्मक वातावरण निर्माण करणारी होती.

 

राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा तसा फायदाही झाला. राहुल गांधी ही व्यक्ती सामान्य माणसांशी जोडलेली वाटते, हे लोकांना पटलं. ते प्रेमाबद्दल बोलतात, दंगलीबद्दल बोलत नाही. आता पूर्व ते पश्चिम हा प्रवासही अभूतपूर्व असेल आणि संपूर्ण इंडिया आघाडीला त्याचा फायदा होईल."

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

Rahul Gandhi news : काँग्रेस सत्तेत आल्यास सर्व प्रथम जातीगत …


नागपूर - ‘देशात सर्वाधिक लोकसंख्या इतर मागास वर्गीयांची (ओबीसी) आहे. दलितांची १५ टक्के तर आदिवासींची संख्या १२ टक्के एवढे आहे. मात्र, देशातील सनदी अधिकाऱ्यांच्या यादीत फक्त दोन-चारच ओबीसी अधिकारी सापडतील. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही हेच चित्र दिसून येते.

 

या माध्यमातून भाजपला सामाजिक आरक्षण मोडीत आणायचे असल्याचे स्पष्ट होते. मात्र, काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल आणि लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्याचा वाटा दिला जाईल,’ अशी घोषणा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केली.

 

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपूरमधील दिघोरी येथील पटांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि देशभरातील सातशे आमदार आणि खासदार उपस्थित होते.

 

यात तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खु, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. काही कारणास्तव सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या.

 

राहुल गांधी म्हणाले, ‘नागपूर येथील कार्यकर्त्यांना आमचे विचार आणि संदेश लगेच समजताच. म्हणूनच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला कर्मभूमी केले होते.’ काँग्रेससाठी नागपूर व महाराष्ट्राचे स्थान विशेष असून, येथून सुरू केलेल्या परिवर्तनाच्या लाढाईत आम्ही नेहमी विजयी झालो आहोत, असे सांगत राहुल यांनी, आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच जिंकेल असे भाकीत वर्तविले.

 

‘राजेशाही आणेल’

 

राहुल गांधी म्हणाले, ‘स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने ब्रिटिशांसोबत राजेशाही विरोधातही लढा दिला. काँग्रेसने संविधानाची निर्मिती करून गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला. प्रत्येकाच्या मताची किंमतही सारखीच ठेवली. मात्र, दहा वर्षांच्या काळात भाजपने लोकांचे हित आणि लोकशाही जपणाऱ्या सर्व संस्था बंद पाडण्याचे काम केले आहे. त्यांना पुन्हा या देशात राजेशाही आणायची आहे.’

 

आमचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद

 

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्‍न विचारला म्हणून त्यांना भाजपमधून बाहेर पडावे लागले, असे सांगत राहुल गांधी यांनी, काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्ता आमच्याशी थेट बोलू शकतो, असे सांगितले. ते म्हणाले, ‘भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी कोणताही कार्यकर्ता थेट बोलू शकत नाही. काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला थेट प्रश्‍न विचारू शकतो. आमचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद असतो.’